आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचा हल्लाबोल:'अशाप्रकारचे भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे, राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी'- प्रविण दरेकर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टिपण्णी केली होती

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीपण्णी केली होती. त्यावरुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दरेकर म्हणाले की, 'संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केले पाहिजे, हेच ते सांगत आहेत. संजय राऊतांनी कोर्टावर अशाप्रकारचे भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी,' अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाचा प्रश्न आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचे, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. तसेच, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचेही राऊतांनी म्हटले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser