आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 चे हिरो:करमबीर यांच्या नजरेसमोर पत्नी आणि दोन मुलांचा मृतदेह होता, तरीही ते वाचवत राहिले दुसऱ्यांचे प्राण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रतन टाटा देखील कांग यांचे काम पाहून हैरान होते

मुंबई झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण झाले आहेत. आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत, ज्याच्या डोळ्यांसमोर त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह पडले होते, पण तो जीव तोडून दुसऱ्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होता.

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ताज हॉटेलचे जनरल मॅनेजर राहिलेल्या करमबीर सिंह कांग यांच्याविषयी आम्ही बोलत आहोत. 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यांमध्ये मुंबईचे ताज हॉटेल जळत होते. त्यावेळी करमबीर सिंह कांग यांनी जी हिंमत दाखवली होती, ती लीडरशीपचे एक उदाहरण आहे.

कांग यांना अनेक सन्मान प्राप्त झाले
कांग यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे हॉटेलमध्ये शेकडो लोकांचे प्राण वाचले. परंतु त्यांनी आपली पत्नी नीति (40), मुलगा उदय (वय 14) आणि समर (5) यांना गमावले. या तिघांचा मृतदेह त्यांच्या हॉटेलच्या खोलीत शौचालयात आढळला. कांग यांना त्यांच्या कामगिरीसाठी फोर्ब्स पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडले गेले होते. सध्या ते अमेरिकेतील ताज हॉटेलचे एरिया डायरेक्टर आहेत.

रतन टाटा देखील कांग यांचे काम पाहून हैरान होते
हल्ल्यानंतर रतन टाटा म्हणाले होते की, 'मी कांग यांच्या जवळ गेलो आणि त्यांना सांगितले की, मला किती दुःख आहेत, तर ते म्हणाले, सर आम्ही ताजला पहिल्यासारखे बनवणार आहोत.' हे उत्तर ऐकूण टाटा हैराण झाले. प्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती निकोलस सरकोजी यांनी कांग यांच्या हिंमतीसाठी त्यांना ऑफिसर ऑफ नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिटचे मेडल देऊन सन्मानित केले होते. हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये फ्रान्सचे लोकही होते.

फायर ब्रिगेडचे कर्मचारी कांग यांच्या कुटुंबाजवळ पोहोचले तेव्हा खूप उशीर झाला होता दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर ज्या खोलीमध्ये आग लागली होती, त्या मध्येच कांग यांच्या पत्नी आणि दोन मुले होते. त्यांचा आवाज बाहेरपर्यंत स्पष्ट एकू येत होता. त्यांना सुरक्षित काढण्यासाठी कांग प्रत्येक पोलिस आणि फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याला हात जोडून विनंती करत होते. कांग यांच्यावर त्यावेळी दोन जबाबदाऱ्या होत्या.

पहिली जबाबदारी आपल्या कुटुंबाला सुरक्षित काढण्याची आणि दुसरी हॉटेलमध्ये फसलेल्या इतर लोकांना वाचवण्यासाठी सुरक्षा एजेंसीसोबत को-ऑर्डिनेशन करण्याची. कांग यांच्या मदतीने अनेक लोकांचा जीव वाचला. पण जेव्हा फायर ब्रिगेडचे जवान त्या खोलीमध्ये पोहोचले, कांग यांच्या पत्नी आणि मुलांचा जळून मृत्यू झाला होता.

करमबीरने नाव सार्थक केले, वडिलांनी हिंमत वाढवली
दहशतवादी हल्ल्याच्या रात्री जेव्हा कांग यांनी आपले वडील यांना फोन केला तेव्हा त्यांनी हे म्हणत त्यांची हिम्मत वाढवली की, तु एक बहाद्दर शिख बनला. तु एक आर्मी जनरलचा मुलगा आहेत. पत्नी-मुलांच्या मृत्यूचे दुःख कांग यांना हलवू शकले नाही. त्यांनी याला नियती मानून सहन केले. अशा प्रकारे करमबीर यांनी आपल्या नावाची सार्थकता सिद्ध करुन दाखवली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser