आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Karnataka CM Is Not Bigger Than Supreme Court Fadnavis' Reply To Bommai; Deputy Chief Minister's Criticism Of Uddhav Thackeray On The Governor's Issue

सुप्रीम कोर्टापेक्षा कर्नाटकचे मुख्यमंत्री मोठे नाही:फडणवीसांचे बोम्मईंना प्रत्युत्तर; राज्यपालांबाबत शरद पवार बोलताच ठाकरेंना जाग आली

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्नाव सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत अथवा कुणीही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही असे ठणकावत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार प्रहार केले. भाजप विरुद्ध भाजप अशी लढाईही आता सीमावादामुळे पाहायला मिळत आहे.

उदयनराजेंनी पत्र लिहिले

''मी कोणतेही चिथावणीखोर वक्तव्य केले नाही, कायदेशिररित्या जे आधीपासून बोलतोय तेच बोलले अशी स्पष्टोक्ती देतानाच राज्यपालांबाबत उदयनराजे यांनी केंद्राला पत्र लिहिले. त्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आले. पवार बोलले की, उद्धव ठाकरेंना जाग आली.'' अशी खोचक प्रतिक्रीया फडणवीसांनी दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री मोठे नाही

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्नावर निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत अथवा कुणीही मोठे नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा ठोकला तरीही महाराष्ट्रातील एकही गाव जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही अपेक्षा आहे.

चिथावणीखोर वक्तव्य नाही

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले, मी कुठलेही चिथावणीखोर वक्तव्य केले नाही. मी एवढेच सांगितले की, बेळगाव, निपाणी, कारवारसह जी गावे आहेत त्यावर आमचा दावा आहे. तो आज आम्ही सांगितलेला नाही. आम्ही सर्वोेच्च न्यायालयात आम्ही भांडतो ती आमची भूमिका आहे. कायद्याच्या चौकटीत जी मागणी आम्ही केली त्याला कुणीही चिथावणीखोर म्हणू शकत नाही.

सर्वांची एकच भूमिका

फडणवीस म्हणाले, माझा सवाल आहे की, आमच्यापेक्षा जास्त काळ काॅंग्रेसचे राज्यात आणि कर्नाटकातही होते. वेगवेगळी सरकार दोन्ही राज्यात होती. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारने आता जी आहे तीच भूमिका ठेवलेली आहे.

सीमावादावर राजकारण नको

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी आप - आपसांतील वादात सीमावाद कधीही आणला नाही आणि आता तो कुणीही आणू नये. त्यामुळे सीमावादाबाबतचा आपला दावा खिळखिळा होईल.

म्हणून ठाकरेंनी प्रतिक्रीया दिली

फडणवीस म्हणाले, राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रात नको याबाबत छत्रपती उदयनराजे यांनी केंद्राला पत्र लिहिल्यानंतर शरद पवारांच्या ही बाब लक्षात आली. छत्रपती उदयनराजे यांनी पाॅइंटआऊट केल्यानंतर पहिली प्रतिक्रीया शरद पवारांनी दिली. पवारांनी प्रतिक्रीया दिली म्हटल्यावर उद्धव ठाकरे प्रतिक्रीया देणार हे नक्कीच.

उद्धव ठाकरेंकडून राजकारण

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून राज्यपालाच्या वक्तव्यावर राजकीय रंग देण्याचा प्रयत्न दिला जात आहे. छत्रपती शिवराय हे उभ्या भारताचे दैवत आणि आदर्श आहेत. त्याबद्दल कुठलाही वाद होऊ शकत नाही आणि राजकारणही होऊ शकत नाही.

ठाकरे खडबडून जागे

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र बंदची उद्धव ठाकरे हाक दिली आणि भाजपलाही त्यांनी आवाहन केले हे तरी मी ऐकले नाही. त्यामुळे मी यावर प्रतिक्रीया देणार नाही. परंतु, ते आज खडबडून जागे झाले आहेत. मी आधीच म्हटलो की, शरद पवार बोलले म्हणून उद्धव ठाकरे बोलले.

बातम्या आणखी आहेत...