आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभव झाला आहे. बेळगावमध्ये समितीच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. येथे काँग्रेसचे 11 तर भाजपचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभागातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे पराभूत उमेदवार
1. बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर
2. बेळगाव उत्तर – अमर येळ्ळूरकर
3. बेळगाव ग्रामीण – आर. एम. चौगुले
4. निपाणी – जयराम मिरजकर
5. यमकनर्डी – मारुती नाईक
6. खानापूर –मुरलीधर पाटील
बेळगाव जिल्हा निवडणूक निकाल (विजयी उमेदवार)
1) दक्षिण - अभय पाटील - भाजप
2) खानापूर - विठ्ठल हलगेकर- भाजप
3) निपाणी - शशिकला जोल्ले- भाजप
4) गोकाक - रमेश जारकीहोळी- भाजप
5) आरभावी - भालचंद्र जारकिहोळी - भाजप
6) हुक्केरी - निखिल कित्ती- भाजप
7) अथणी - लक्ष्मण सौदी - काँग्रेस (भाजप बंडखोर)
8) कागवड - भरमगौडा कागे- काँग्रेस
9) कित्तुर -बाबासाहेब पाटील- काँग्रेस
10 ) बैलहोनगल - महानतेश कौझलगे- काँग्रेस
11) कुडची - महेंद्र तमन्नावर- काँग्रेस
12) सौदत्ती - विश्वास वैद्य- काँग्रेस
13) रामदुर्ग - अशोक पट्टण- काँग्रेस
14) यमकनगर्डी -सतीश जारहीहोळी - काँग्रेस
15) चिकोडी - गणेश हुक्केरी- काँग्रेस
16) बेळगाव ग्रामीण - लक्ष्मी हेब्बाळकर - काँग्रेस
17) उत्तर - राजू शेठ - काँग्रेस
18) रायबाग - दुर्योधन ऐवळे - भाजप
राष्ट्रवादीची संधी हुकली
बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघावर काँग्रेसने विजय मिळवला आहे. निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी विजय मिळवला.
राऊत, फडणवीस उतरले होते प्रचारात
सीमाभागातील एकूण 6 मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या भागातील मतदार कोणाला कौल देतात, याबाबत उत्सुकता होती.
संबंधित वृत्त
कर्नाटक विधानसभेचा निकाल:आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस 114 जागांवर पुढे, पक्षाने सर्व आमदारांना बंगळुरूत बोलावले
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस 114 जागांवर, भाजप 73 जागांवर, जेडीएस 30 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या कलानुसार काँग्रेस 115, भाजप 73, जेडीएस 30 आणि इतरांना 6 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.