आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 6 नेत्यांवर जबाबदारी:कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपची देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज; महाराष्ट्रातून रावसाहेब दानवेंकडे धुरा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली असून त्यात रावसाहेब दानवेंवरही जबाबदारी सोपवली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.

कोणाचा आहे समावेश?

यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप जोरदार मोर्चेबांधणी करत असून भाजपसाठी अवघड वाटणाऱ्या 54 मतदारसंघात भाजपने एकएका नेत्याची नियुक्ती केली आहे. यामध्ये भाजपचे नेते राम शिंदे यांच्यावर कर्नाटकच्या अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कर्नाटक इलेक्शन अपडेट

  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे.
  • 20 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
  • 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपची जोरदार फिल्डींग

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 170-180 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी ही माहिती दिली. उमेदवार निवडीत कोणताही गोंधळ नसल्याचे त्यांनी सांगितले.

सीएम बोम्मई यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले की सोमवारी संध्याकाळी यादी जाहीर केली जाणार असली तरी अजून काही चर्चा व्हायची आहे. तसेच काही उमेदवारांचा ग्राऊंड रिपोर्ट येणे बाकी असल्याने मंगळवारी किंवा बुधवारी यादी जाहीर होणार आहे.

येडियुरप्पा यांनी सोमवारी संध्याकाळी यादी येईल असे सांगितले होते भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी माहिती दिली होती की कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सोमवारी संध्याकाळपर्यंत 170 ते 180 उमेदवारांची यादी जाहीर करू शकतो. रविवारी सायंकाळी पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह कर्नाटक भाजपचे नेते उपस्थित होते.