आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दरमहा 70 हजार कमाईचे आमिष दाखवून करुणा मुंडे यांना 30 लाखांना गंडवले

संगमनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या बांधकाम कंपनीत पैसे गुंतवले तर मोठा फायदा करून देऊ, असे सांगून सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे (४२, सांताक्रुझ, मुंबई) यांना ३० लाख रुपयांना गंडवले. जानेवारीत तालुक्यातील घुलेवाडी येथे हा प्रकार घडला. पैसे परत न करता धमक्या दिल्या जात असल्याने करुणा मुंडे यांनी शुक्रवारी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून तिघांवर गुन्हा दाखल केले.

भारत संभाजी भोसले (कोंची, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. करुणा मुंडे अनेक दिवसांपासून भारत भोसले यांच्या संपर्कात आहेत. संगमनेर येथे शासकीय विश्रामगृहात नव्याने स्थापन केलेल्या शिवशक्ती सेना पक्षाची भूमिका मुंडे यांनी स्पष्ट केली होती. आरोप करण्यात आलेला भारत भासले, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग व समृद्धी संतोष अभंग त्या वेळी मुंडे यांच्याबरोबर होते.

संधीचा फायदा घेत त्यांचा विश्वास संपादन करत भोसलेने आमची लेव्हलरोट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची बांधकाम कंपनी असून तुम्ही त्यात पैसे गुंतवले, तर तुम्हाला मोठा फायदा होईल. ३० लाखांची गुंतवणूक केली, तर दरमहा ४५ ते ७० हजार रुपये मिळतील. कंपनीला जास्तीचा फायदा झाला, तर त्या प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष दाखवले. मुंडे यांनी भोसलेवर विश्वास दाखवत जानेवारीत १० दिवसांत कॅश व चेक स्वरूपात ३० लाख रुपये दिले होते.आपली फसवणूक झाल्याचे मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी संगमनेर शहर पोलिस स्टेशन गाठले. मुंडे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

एकदाच दिले ४५ हजार
तिघा भामट्यांनी कंपनीबाबत कोणतीच माहिती दिली नाही. कुठलाही नफा दिला नाही. फेब्रुवारीमध्ये एकदाच मुंडे यांना ४५ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर पैसे मिळत नसल्याने त्यांनी भोसलेकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. खोट्या गुन्ह्यात फसवून बदनामी करण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...