आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणेतील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत 'मविआ'ची आज बैठक झाली. ''दोन्ही पोटनिवडणूक एकत्रित लढण्यावर आम्ही ठाम आहोत. आता केवळ वरिष्ठांशी सल्लामसलत करून अंतीम निर्णय उद्या घोषित करू अशी माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत मविआच्या नेत्यांनी आज दिली. या पत्रकार परिषदेला तसेच शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे जयंत पाटील आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
दोन्ही जागांचा आढावा घेतला
जयंत पाटील म्हणाले, कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या दोन्ही जागांचा आढावा घेतला. मित्रपक्षांशी आम्ही आज संध्याकाळी चर्चा करणार आहोत. त्यानंतर आम्ही आमचा अंतीम निर्णय घोषित करू. मविआतील घटकपक्षांशी सल्लामसलत करुन आमच्या पक्षांच्या वरिष्ठांची चर्चा करणार आहोत.
धनशक्तीचा कोकणात विजय
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात काल झालेल्या निवडणुकीत मविआने निर्विवाद वर्चस्व मिळवले व मोठ्या फरकाने मविआ निवडून आली आहे. आम्ही सर्वांना विश्वासात घेत दोन्ही जागांचा निर्णय घेवू. शेकापच्या बाळाराम पाटील यांचे काम मविआने चांगले केले. पण धनशक्तीचा विजय तेथे झाला.
शुभांगी पाटील यांचेच काम केले
जयंत पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंना राष्ट्रवादीने मदत केल्याचे अजित पवारांनी मान्य केल्याबाबत जयंत पाटील म्हणाले , राष्ट्रवादी काॅंग्रेसने शुभांगी पाटील यांचे काम केले. अजित पवार जे बोलले त्याचा अर्थ असा असेल की, नाशिक, नागपूरमध्ये लोकांचा संम्रभ झाला त्यामुळे हे झाले असावे असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. गतवेळी पोटनिवडणुकीत मुंबईत नाईलाजाने उमेदवारी मागे घ्यावी लागली. ज्या मर्यादा पाळायच्या त्या पाळल्या गेल्या नाहीत. सर्व बाबींचा विचार करता आम्ही पाहू आम्ही याबाबत सर्वांशी बोलत आहोत.
मविआ म्हणून पोटनिवडणुका लढणारच - देसाई
सुभाष देसाई म्हणाले, संपूर्ण आढावा घेवून आम्ही चर्चा केली. पक्षांच्या वरिष्ठांशी सल्लामसलत करु. मविआ म्हणून आम्ही दोन्ही निवडणुका एकजुटीने लढवणार आहोत. शिवसेना कुठे मागे पुढे राहते हे पाहण्यापेक्षा मविआ म्हणून आम्ही एकत्रित विचार केला असून अंतीम निर्णय उद्या होईल.
मविआचीच काळजी का? - पटोले
नाना पटोले म्हणाले, आमची भूमिका मविआ म्हणून स्पष्ट आहे. आम्ही एकत्रित निवडणूक लढवून जिंकू. आताच्या निवडणुकात एकनाथ शिंदेंना काहीच मिळाले नाही. भाजप आणि शिंदेंनी जे सरकार स्थापन केले त्यातील इ कुठे गेला हा प्रश्न विचारावा. मविआचीच काळजी सर्वांना का आहे. मविआ दोन्ही जागा निवडून जिंकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.