आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआचे ठरले:कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसबा मतदारसंंघातून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा करण्यात आली आहे.

कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

याबाबत आज पत्रकारांशी बोलताना रविंद्र धंगेकर यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला फोन करुन फॉर्म भरण्यास तयार राहण्याचे सांगितले आहे. आज सकाळी 11 वाजता मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. काँग्रेसने रविंद्र धंगेकरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यामुळे त्यांची लढत भाजपाच्या हेमंत रासने यांच्याशी होणार आहे.

आज रासने-धंगेकर उमेदवारी दाखल करणार

आज कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत. तर, रविंद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेल, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहतील, असे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

रविंद्र धंगेकर टिळक वाड्यात

आज सकाळीच काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी टिळक वाड्यात जाऊन लोकमान्य टिळक व कसब्याच्या दिवगंत भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे दर्शन घेतले. याबाबत रविंद्र धंगेकर यांनी सांगितले की, पुण्यात कुणीही शुभकार्याची सुरुवात टिळक वाड्याला भेट दिल्याशिवाय करत नाही. मी दरवर्षी टिळक वाड्यात येऊन लोकमान्य टिळकांना मानवंदना देतो. मुक्ता टिळक व मी 25 वर्षे समाजकारणात होतो. म्हणून आज त्यांनाही वंदन करुन मी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसेच, या निवडणुकीत मविआ ताकदीने लढणार व जिंकणार, असा विश्वासही रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

संबंधीत वृत्त

कसबा पेठेत बॅनर्सद्वारे भाजपला सवाल:कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?

पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपला थेट प्रश्न विचारणारे बॅनर्स लागले आहेत. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?, असा सवाल या बॅनर्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...