आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदार दिघेंची शिंदे गटावर टीका:आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण चिन्ह गोठवायला निघाले

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण चिन्ह गोठवायला निघालेत. एकनाथ शिंदे धनुष्यबाणाला इतके का घाबरले? असा प्रश्न आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे गटाला विचारला आहे. सुप्रिम कोर्टात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर दिघेंनी सडकून टीका केली आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सकाळी साडेदहा दरम्यान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्यात यावी, यासह शिवसेनेने धनुष्यबाण गोठवावे आणि घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली. शिंदे गटाच्या भूमिकेवरुन टीका होत आहे.

राजकारणात मोठी चर्चा

सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कोणत्या गटाला द्यावे, याचा निर्णय घेऊ नये, असे महत्वाचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या केलेल्या मागणीमुळे राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले केदार दिघे

बंडानंतर ते सत्तास्थापना झाली तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांकडून आम्हीच ओरिजनल शिवसेना असल्याचा वारंवार उल्लेख केला जात होता. यावरुनच केदार दिघे यांनी टीका केली आहे. ट्विट करुन ते म्हणाले, शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे, आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे, बाळासाहेबांचीच निशाणी गोठवायला निघाले आहेत, अशा शब्दात केदार दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

आम्ही अजूनही शिवसैनिक-शिंदे

याआधीच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आमच्यावर चुकीच्या पद्धतीने अपात्रतेचा आरोप लावण्यात आला आहे. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात, वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना सांगितले होते की, शिंदे गटात सामील होणारे आमदारांनी जर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच ते घटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेपासून वाचू शकतात. अन्यथा अपात्रतेपासून वाचण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असे ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...