आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केईएममध्ये 5 कोटी घोटाळ्याचा आरोप:एका अकाऊंटन्टला अटक तर दुसरा फरार; बनावट स्वाक्षऱ्याव्दारे काढत होते पैसे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्याचे केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.

मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय केईएममध्ये 5 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलीसांनी अकाऊंटन्टला पाच कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केली आहे. या संबंधित प्रकरणात दोन अकाऊंटन्टवर आरोप ठेवण्यात आला असून एकाला अटक केली आहे तर दुसरा फरार आहे. तब्बल दहा वर्ष या दोन आरोपीनी संस्थेतील अधिष्ठातांच्या बनावट स्वाक्षरीने रुग्णालय प्रशासनाच्या खात्यातून हे पैसे स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर व इतर खात्यांमध्ये वळवल्याचे तपासात समोर आले आहे. आरोप करण्यात आलेले हे दोन अकाऊंटन्ट गेली दहा वर्षे झाली ही पैशाची अफरातफर करत असल्याचं समोर आलं आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

केईएमचे या आधीच्या अधिष्ठातांच्या नावाचा गैरवापर करुन, त्यांच्या बनावट सह्या करुन हे अकाऊंटन्ट पैसे काढत होते. परळचे केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या अकाऊंटमधून हे पैसे काढण्यात येत होते. यामध्ये डॉक्टर अविनाश रेघे आणि डॉक्टर निर्मला सुपे यांच्याही नावाचा गैरवापर करून या आरोपींनी पैसे काढले होते. सध्याचे केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला.

त्या अहवालाच्या आधारे या दोन अकाऊंटन्टवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. सेठ गोवरधन सुंदरदस मेडीकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाच्या आकाऊंटमध्ये हा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याचं नाव राजन राऊळ आहे. तर या प्रकरणात श्रीपाद देसाई याचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...