आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांवरील टीका प्रकरण:केतकी चितळेंना मानसिक उपचारांची नितांत गरज, चांगल्या दवाखान्यात नेऊन उपचार द्यावेत; अजित पवार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केतकी चितळेची पोस्ट म्हणजे विकृती आहे. त्यांना मानसिक उपचारांची नितांत गरज असून एखाद्या चांगल्या दवाखान्यात नेऊन त्यांना उपचार दिले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी दिली. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारी पोस्ट केली आहे. तिच्या या टीकेवर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय.

आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आपल्या चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे. कुठल्याच व्यक्तीने कुणाच्याही बद्दल कसे बोलले पाहिजे, काय बोलले पाहिजे, याचे प्रत्येकाने भान ठेवावे. केतकी चितळेची पोस्ट म्हणजे विकृती आहे. अशा पद्धतीने कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

राजकीय मत भिन्नता असू शकते. पण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची महाराष्ट्रात कधीही गरज नव्हती. सत्ताधारी पक्ष असो किंवा इतर कोणी असे वक्तव्य करू नये, असे म्हणत अजित पवार यांनी केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध केला.

शांतता प्रस्थापित करावी -

औरंगाबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे घेतलेल्या दर्शनावर बोलताना अजित पवार म्हणाले, की आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू-फुलेंचा आहे. जुन्या गोष्टी उगाळून काही उपयोग नाही. आता आपल्यापुढे फार वेगळे प्रश्न आहेत. परंतू काही लोकांनी जाणीवपूर्वक बाहेर यायचं आणि जे महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही. आशा पद्धतीचे कृत्य करायचे. हेदेखील बरोबर नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कायदा व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नांची शिक्स्त करते. तेव्हा इतरांनीही परिस्थिती बिघडू न देता जातिय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन अजित पवारांनी केले.

केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर फेसबूक पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली येथून आज सायंकाळी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी चितळेवर राज ठाकरेंपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

नरकात जाण्याची वापरली भाषा

अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे असे तीने या पोस्टमध्ये लिहिले आहे. पण याच पोस्टमध्ये शरद पवारांबाबत नरकाची भाषा केले गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...