आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाेसरी जमीन खरेदी प्रकरण:खडसेंविरोधात पुरावे घेऊन दमानिया ईडीसमोर, पुढील आठवड्यात खडसेंची होणार चौकशी

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीपूर्वी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) माहितीची जोरदार जमवाजमव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या पूर्वाश्रमीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी ‘ईडी’च्या कार्यालयास मंगळवारी भेट दिली. या भेटीदरम्यान ईडीने दमानिया यांचा जबाब नोंदवून घेतला. मला ईडीकडून समन्स आले होते, म्हणून मी आले. त्यांनी मला जी माहिती विचारली ती मी दिली. मला जर पुन्हा ईडीतर्फे बोलवले गेले तर मला यावे लागणार आहे, असे अंजली दमानिया यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले. “मला कुठल्याही राजकारणात पडायचे नाही. माझी न्यायालयात याचिका होती, त्यासंदर्भात मला ईडीने काही माहिती विचारली. ती माहिती मी ईडीला दिली आहे. यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही,” असेही दमानिया यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांना ईडीकडून पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी ३० डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. पुढील आठवड्यात ते ईडीसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser