आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया:आयुष्याच्या या वळणावर खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपला रामराम केला, यामागे नक्कीच मोठे कारण असणार - संजय राऊत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलि आहे. येत्या 23 अक्टोबरला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. आयुष्याच्या या वळणावर खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपला रामराम ठोकला, यामागे नक्कीच मोठे कारण असणार असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, 'आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते भाजपासाठी काम करत असलेले खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठे कारण असणार, उनकी कुंडली जम गई होगी... असे राऊत म्हणाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये खडसेंचे स्वागत केले आहे.

भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्या म्हणजेच 23 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसल्याचे म्हटले आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...