आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृताची महिनाभरानंतर सुटका:सात लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून सांगलीत डांबले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभरापूर्वी सात लाख रुपये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची मुंबई पोलिसांनी सांगली येथून सुखरूप सुटका केली. या अपहरणात सहभागी असलेल्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी रेस्क्यू ऑपरेशन करत अपहृत तरुणाची सांगली येथून सुटका केली आहे. अपहरणाच्या कटात एका २८ वर्षीय आरोपीसह इतर चार जणांचा सहभाग असल्याचे एनएम मार्ग पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले. फुल विक्रेत्या तरुणाचे १ डिसेंबर २०२२ रोजी अपहरण करण्यात आले होते. त्याला सांगली येथील अज्ञातस्थळी नेण्यात आले. काही दिवसांनंतर अपहरणकर्त्यांनी या तरुणाच्या पत्नीला फोन करून ७ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तांत्रिक विश्लेषणाआधारे पोलिसांनी सांगली आणि कर्नाटकात पथके पाठवली. महिनाभराच्या शोधानंतर अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली. आर्थिक देवाणघेवाणीतून या तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...