आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार देणाऱ्या तरुणाची हत्या:प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून; 6 लेकरांची आई गजाआड

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम करत असूनही लग्नास नकार दिल्यामुळे सहा मुलांची आई असलेल्या महिलेने रिक्षाचालक प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून केला. रमजान शेख असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून पोलिसांनी खून करणारी महिला जोहरा हिला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी आरे कॉलनीतून तिला अटक केली.

रमजान शेख (२६) हा ऑटोरिक्षा चालवत होता. रमजान आणि जोहरा गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दोघेही फिल्टर पाड्यात राहत होते. लग्नावरून या दोघांमध्ये वादविवाद सुरू होता. त्याच्यासाठी ते पोलिस स्टेशनमध्येही जात होते. मात्र रमजान शेख वारंवार लग्न करण्यास टाळत असल्याने जोहराने त्याचा खून केला. पोलिस चौकशीत जोहराने तिचा गुन्हाही कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोहराला रमजानशी लग्न करण्याची इच्छा होती. ज्या वेळी हे दोघे एकत्र राहत होते त्या वेळी रमजान तिच्याशी लग्न करण्यासाठी तयारही होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो लग्नाचे नावच घेत नव्हता. त्यामुळेच जोहराला रमजानच्या वागण्यावर संशय होता. जोहराचे आधी लग्न झालेले आहे आणि तिला त्या नवऱ्यापासून ६ मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी ती पतीपासून वेगळी राहत होती. जोहरा तिच्या दोन मुलांसह रमजानसोबत राहत होती, तर तिची इतर चार मुले ही उत्तर प्रदेशात तिच्या आईकडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...