आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज प्रकरण:आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी आज पुन्हा न्यायालयात हजर होणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानविरुद्ध एनसीबीचा साक्षीदार झालेला किरण गोसावी आज पुन्हा मुंबई न्यायालयात हजर होणार आहे. गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर सिल याने गोसावीवर २५ कोटींचा सौदा केल्याचा आरोप केला होता.

मुंबई पोलिसांच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे केपी गोसावीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. प्रत्यक्षात समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज लोअर परेलचे आहे, ज्यामध्ये अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीची ब्लू मर्सिडीज दिसत आहे. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे ददलानी आणि केपी गोसावी यांच्यात झालेल्या डीलचा संशय बळावला आहे.

वास्तविक गोसावीवर आरोप आहे की, त्याने पैशाच्या बदल्यात ददलानीला वचन दिले होते की,आर्यन खानला अटकेपासून वाचावेल. या संपूर्ण प्रकरणात गोसावीने स्वतःला एनसीबीचा अधिकारी सांगितले होते का, याचाही तपास एसआयटी करत आहे. कारण त्याच्या एसयूव्हीवर 'पोलीस' असे लिहिलेले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एसआयटी लाच घेण्याच्या अँगलनेही तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...