आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराINS विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी जनतेकडून 56 कोटी गोळा केले. मात्र नंतर त्या पैशांचा स्वत:च्या निवडणुकीसाठी वापर केला आणि बरीच मोठी रक्कम मुलगा नील सोमय्या याच्या कंपनीत टाकली, असा आरोप काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. अखेर याप्रकरणी आज भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर ठेवण्यात आला आहे. निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजच शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी सोमय्या पित्रा-पुत्रांना अटक होणारच असा इशारा दिला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
सोमय्यांविरोधात संजय राऊत आक्रमक
पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करताच राऊत किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. 'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेवर युद्धाचे स्मारक बनवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्यांकडून तब्बल 58 कोटींचा निधी गोळा केला. मात्र, हा निधी नंतर त्यांनी राज्य सरकारकडे सोपवलाच नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणी राज्य सरकार चौकशी करेल, असेही त्यांनी काल सांगितले होते. त्यानंतर आज मुंबईतील निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.