आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरिट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल:म्हणाले - उद्धव ठाकरेंचे हवालाकिंगशी संबंध, श्रीधर पाटणकरांची रश्मी व आदित्य ठाकरेंसोबत व्यवसायिक भागिदारी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आता हवालाकिंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरेंचे नाव जोडले आहे. किरीट सोमय्यांनी मुलूंड येथील निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि त्याचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीकडे पाठपुरावा करत आहे, मात्र त्यांच्यावर कुणाची कृपा होती, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, श्रीधर पाटणकर यांचे रश्मी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत व्यावसायिक भागिदारी होती, असा आरोपही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंची झोप उडेल!
किरिट सोमय्या म्हणाले की, सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडेल, असे मी यापुर्वीच म्हटले होते. आता हवालाकिंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत, हे समोर आले पाहिजे. माझ्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची माफिया सेना लगेच बोंबाबोंब करेल. मी 11 नोव्हेंबर 2020 रोजीही हा प्रश्न विचारला होता. तसेच, उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे जमिनी व्यवहाराचे संबंध आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे डर्टी डझन!
कोणाच्या वाट्याला किती रुपये गेले, याचा हिशोब उद्धव ठाकरेंनीच द्यावा. तसेही सगळा हिशोब समोर येणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ठरवले तर कोणालाच मेहनतच करावी लागणार नाही. पुढे बघा उद्धव ठाकरे यांचे डर्टी डझन सगळ्यांचा हिशोब बाहेर येणार. त्याची सुरुवात आता झाली आहे, असे किरिट सोमय्या म्हणाले.

रश्मी, आदित्य ठाकरेंवरही निशाणा!
रश्मी ठाकरेंच्या नावावर 2019मध्ये 19 बंगले होते, असे त्यांनी सांगितले होते. मात्र यानंतर उद्धव ठाकरेंनी एकही बंगला नसल्याचे 2021 ला सांगितले. असाच किस्सा श्रीधर पाटणकर यांचाही आहे. तसेच, श्रीधर पाटणकर यांच्योसोबत रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांचेही व्यावसायिक संबंध आहेत, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...