आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी खुलासे करणार:ठाकरे सरकारमधील आणखी 3 बड्या मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा घणाघात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय मंडळी दिवाळीच्या फटाक्याचे उदाहरण देऊन आरोप प्रत्यारोप करत होते. कोणी म्हणे की, मी सुतळी बॉम्ब फोडणार आहे, तर कोणी म्हणजे की, मी तर दिवाळीनंतर फोडणार आहे.

मात्र सर्वसामान्यांच्या दिवाळीप्रमाणेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खरोखर एक मोठा सुतळी बॉम्ब फोडला आहे. येत्या महिन्याभरात ठाकरे सरकारमधील तीन मोठ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता महिन्याभरात कोणत्या नेत्यांचे पितळ सोमय्या उघडे करणार हे पाहावे लागेल.

सोमय्या म्हणाले की, "येत्या महिन्याभरात ठाकरे सरकारमधील तीन मोठ्या मंत्र्यांचे घोटाळे मी बाहेर काढणार आहे. या मंत्र्याचे राज्यातील राजकारणात मोठे वजन आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीला काय जवाब दिला हे तरी उद्धव ठाकरे यांना माहिती आहे का? चौकशीदरम्यान परब शुद्धीवर नव्हते" असा घणाघात सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांसह अनिल परब यांच्यावर लगावला.

तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार
येत्या महिन्याभरात ठाकरे सरकारमधील तीन मोठ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. या मंत्र्यांचे राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठे वजन आहे, आज सकाळी सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजर राहिलो. अभिनेता भाऊ कदमचा कार्यक्रम होता त्यावेळी भाऊ कदम म्हणाले की, आम्ही फक्त दिवाळीत फटाके फोडतो.

किरीट सोमय्या मात्र वर्षभर फटाके फोडत असतात. दिवाळीनिमित्त आज बायकोच्या हातची करंजी खाल्ली. आता पुढच्या दर आठवड्यात एकाएका मंत्र्याचा पाठपुरावा घेणार. असे सोमय्या यांनी सांगितले. मात्र त्यांना नाव विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव सांगितले नाही.

बातम्या आणखी आहेत...