आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांचा घरतांच्या खांद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा:म्हणाले -मुख्यमंत्री दगड असला तरी त्याचा सन्मान व्हावा; घरातांच्या मुलाखतीचा दिला दाखला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोलता बोलता सरकारी वकील प्रदीप घरत खरे बोलून गेले, असे ट्विट करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दगड असतील तरही त्याचाही आदर केला पाहिजे. असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे.

काय म्हणाले आहे प्रदीप घरत?
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री तो जरी दगड असला तरी पण त्याचा सन्मान केला पाहिजे. असा उल्लेख असलेला व्हिडिओ ट्विट करत किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली आहे. सरकारी वकील यांनी केवळ उदाहरण देण्यासाठी जरी तसा शब्द प्रयोग केला असला तरी सोमय्यांनी मात्र त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सोमय्या - शिवसेना वाद
सोमय्या आणि शिवसेना हा वाद राज्यातील जनतेला सर्वश्रूत आहे. सोमय्यांची खासदारकी जावी यासाठी सगळी शिवसेना कामाला लागली होती. आणि भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये असा हट्ट धरून बसली होती. यानंतर भाजपने त्यांच्याऐवजी भाजपच्या एका नगरसेवकाला उमेदवारी देत सोमय्यांचा पत्ता कट केला होता. यानंतर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोमय्या सोडत नाही. महाविकास आघाडीच्या पविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे नेते अशी त्यांची ओळख झाली आहे.

ठाकरे सयरकारमधील मंत्री असो की उद्धव ठाकरेंचे कुटुंबिय यांचे कथित घोटाळे बाहेर काढणार अशी घोषणा सोमय्या नेहमी करत असतात. आणि त्यासाठी केंद्रीय यंत्रणाकडे पाठपुरावा करताना दिसत असतात. यामुळे शिवसेनेकडूनिही त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत असते. आता त्यांच्या या ट्विटवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...