आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण:भावना गवळी ED चौकशीला गैरहजर राहताच सोमय्यांचं ट्विट, 'चौकशीला इतक्या का घाबरल्या, हिशेब तर द्यावाच लागेल'

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना नेत्या भावना गवळी यांना 5 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगच्या कथित प्रकरणात समन्स बजावले होते. पण, त्या चौकशीला गैरहजर राहिल्या. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत भावना गवळी यांना कशाची भिती वाटत आहे. हिशेब तर द्यावाच लागेल, असे म्हणत टीका केली.

सोमय्या यांनी टि्वट केले, की 100 कोटींचा घोटाळा, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी ईडीच्या चौथ्या समन्सलाही उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भीती कशाची वाटते त्यांना ? हिशोब द्यावाच लागणार, असे ते म्हणाले.

भावना गवळी चारही समन्सला गैरहजर -

सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे भावना गवळी यांना याआधी 4 ऑक्टोबरला समन्स बजावले होते. त्यानंतर 15 दिवसांनी त्यांना पुन्हा 'ईडी'ने समन्स बजावले होते. पण चिकनगुनिया झाल्याचे सांगत त्यावेळीसुद्धा भावना गवळी चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर बजावण्यात आलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही भावना गवळी चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या. तिन्ही समन्सनंतरही गैरहजर राहिल्याने ईडीने पुन्हा भावना गवळी यांना 5 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगच्या कथित प्रकरणात समन्स बजावले होते. पण, त्या चौकशीला गैरहजर राहिल्या आहेत. आता त्यांच्यावर ईडी काय कारवाई करते, हे पाहावे लागेल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांचा कथित गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता.

भावना गवळी सार्वजनिक पटलावरुन दूर -
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर सर्वप्रथम घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर गवळी या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. याच आरोपांच्या अनुषंगानं ईडीनं मोठी कारवाई करत गवळी यांच्या विविध संस्थांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच ईडीने गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना 27 सप्टेंबर रोजी अटक केल होती. गवळी यांच्या अनेक आर्थिक व्यवहारांशी खान याचा थेट संबंध असल्याचं बोललं जातं. ईडीचे सत्र लागल्यानंतर खासदार भावना गवळी अचानक सार्वजनिक पटलावरुन दूर झाल्याचे दिसून आले होते.

बातम्या आणखी आहेत...