आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेवरून सोमय्यांची टीका:म्हणाले- औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चालले आहेत का?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये 8 जूनला जाहीर सभा होणार आहे. त्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का?' असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. येत्या 10 तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार असून, शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करणे सध्या शिवसेनेकडून सुरू आहे. त्यावरुन सोमय्यांनी टीका केली आहे.

सोमय्या म्हणाले की, वसुलीचा पैसा मुख्यमंत्री आमदार विकत घेण्यासाठी वापरत आहेत. राज्यात काय चालले हेच समजेनासे झाले, शिवसेनेची काय अवस्था झाली आहे. माफिया सरकारने जनतेचा पैसा लुटला आणि आता आमदारांना विकत घेण्यासाठी हा पैसा खर्च करण्यात येत आहे. मतांसाठी स्वत:च्या आमदारांना शिवसेना पैसा देत आहे हे इतिहासात पहिल्यांदा घडत आहे, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी केली आहे.

आज संध्याकाळी बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मतांची जुळवाजुळव सध्या शिवसेनेकडून सुरू आहे.

काँग्रेसची देखील आज बैठक

राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहे. काँग्रेस आमदारांना देखील बँग भरुन मुंबई येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. काँग्रेसने इम्रान प्रतापगडींना उमेदवारी दिली आहे

8 जूनला सभा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे उद्या जाहीर सभा होणार आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, शिवसेनेकडून पोस्टरबाजी देखील करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...