आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांच्या अटकेवर प्रतिक्रिया:अनिल देशमुखांनंतर आता नवाब मलिक आणि पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल - किरीट सोमय्या

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सकाळपासून नवाब मलिक यांची चौकशी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मलिकांनंतर पुढचा नंबर हा अनिल परबांचा असेल असे सोमय्या म्हणाले आहेत.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक झाली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यावर सातत्याने विविध आरोप केले जात आहेत. यामध्ये किरीट सोमय्या हे आघाडीच्या नेत्यांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसतात. याला मविआकडून देखील सडेतोड उत्तर दिले जाते. दरम्यान आता ईडीकडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे.

झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे! - मलिक

चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांनी ‘नही झुकेंगे और लढेंगे’ अशी पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...