आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Kirit Somaiya Lodged Complaint Against Maharashtra Government And Police, Accused Of Being Detained Without Reason In Kolhapur; News And Live Updates

सोमय्या यांचा पलटवार:कोल्हापुरात विनाकारण ताब्यात घेतल्याचा आरोप; सोमय्यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांविरोधात केली तक्रार दाखल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमय्यांनी केला मारहाणीचा आरोप

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात नवघर मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत दावा केला होता की, कोल्हापूरला जाताना पोलिसांनी त्यांना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड येथे ट्रेनमधून ताब्यात घेतले होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणामुळे कराडमध्ये थांबवले होते असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तक्रार नोंदवल्यानंतर सोमय्या म्हणाले की, “मुंबई पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले, मला कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला गेला. गणेश विसर्जनाच्या दिवशी मला माझ्या निवासस्थानाबाहेर येण्यापासून रोखण्यात आले. यानंतर रेल्वे स्टेशनवरही मला रोखण्यात आले. यामुळे मी मुलुंड आणि एमआरए मार्ग पोलिस ठाण्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 149, 340, 341, 342 अंतर्गत कायदेशीर नोटीस दिली आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला 24 तासांच्या आत माझी माफी मागावी लागेल असा इशारा ही सोमय्या यांनी यावेळी दिला आहे.

सोमय्यांनी केला मारहाणीचा आरोप
हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या सोमवारी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबईहून कोल्हापूरला जात होते. परंतु, सोमय्या कराडला पोहोचताच पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. त्यानंतर सोमय्यांना यांना राज्यपाल सर्किट हाऊसमध्ये सुमारे 4 तास ठेवण्यात आले. पोलिसांनी सोमय्या यांच्यावर कलम 144 चे उल्लंघन केल्याचा आरोप होता. तर दुसरीकडे, रविवारी रात्री मुंबई पोलिसांनी आपल्याला कोल्हापूरसाठी ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले आणि त्यांच्याशी मारहाण करण्यात आली असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
भाजप नेते सोमय्या यांनी 13 सप्टेंबर रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणाची आणखी चौकशी करण्यासाठी ते आपल्या काही साथीदारांसह कोल्हापुरला जात होते. दरम्यान, सर्कीट हॉऊसमधील पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले होते.

बातम्या आणखी आहेत...