आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Kirit Somaiya Meet To Governer Bhagat Singh Koshyari | Marathi News | Malik Enquiry Ed | Malik Has No Right To Be In The Cabinet; Uddhav Thackeray And Sharad Pawar Help The Mafia Kirit Somaiya

सोमय्यांची राज्यपाल भेट:मलिकांना मंत्रिमंडळात राहण्याचे अधिकार नाहीत; उद्धव ठाकरे आणि शरद पवार माफियांची मदत करतात- किरीट सोमय्या

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली असून, त्यांनी आज रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्याची माहिती राज्यपालांना दिली आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सूरू असताना, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अंडरवर्ल्डच्या संबधित जमीन खरेदी केल्याप्रकरणी मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून कळते. दरम्यान किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या अलिबाग येथील 19 अनधिकृत बंगल्याप्रकरणी राज्यपालांची भेट घेतली आहे. आपण रश्मी उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचे गौडबंगाल राज्यपालांना सांगितले असल्याचे सोमय्या म्हणाले. पुढे ते म्हणाले की, आज आपण राज्यपालांची भेट घेतली असून, अलिबाग मधील वनविभागाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या 19 बंगल्याची चौकशी घ्यायला हवी. उद्धव ठाकरे या बंगल्याप्रकरणी एक शब्दही बोलत नाहीत. त्यामुळे आपण या सर्व 19 बंगल्यांचा गौडबंगाल राज्यपालांना सांगितले असल्याचे सोमय्या म्हणाले.

..म्हणून, मलिकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही
पत्रकारांनी किरीट सोमय्या यांना आज झालेल्या मलिकांवरील ईडी चौकशीवर प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, नवाब मलिकांना असे वाटले की, आमच्यापर्यंत कोणी पोहोचवू शकत नाही. मात्र आता मलिकांचे कारस्थान जनतेसमोर येत आहेत. त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. असे भाष्य सोमय्या यांनी केले.

'हे' माफियांची मदत करतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे माफियांची मदत करतात, त्यामुळे ते 19 बंगल्याप्रकरणी भाष्य करत नाहीत. सोमय्यांना ही सर्व माहिती कोण देते हेच सगळे विचारतात. असे म्हणत सोमय्यांनी स्वत:चेच कौतूक केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. गेल्या 4 तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...