आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल परबांच्या अडचणीत वाढ:साई रिसॉर्टप्रकरणी मुद्रांक निबंधकांनी नोटीस बजावली, वसुलीची प्रक्रिया सुरू होणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी मुद्रांक निबंधकांनी अनिल परबांविरोधात कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

नोंदणी कायद्यांतर्गत खोटी माहिती देणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अनिल परबांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

लवकरच वसुलीची प्रक्रिया सुरू होणार

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुद्रांक निबंधकांनी अनिल परब यांना कलम 82 अन्वये नोटीस बजावली आहे. आतापर्यंत किरीट सोमय्या यांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे मुद्रांक निबंधकांना अनिल परब यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

लवकरच अनिल परब यांच्याकडून मुद्रांक कायदा कलम 33 अन्वये वसुलीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. यासोबतच कलम 59 अंतर्गत फौजदारी कारवाईही सुरू होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण दापोली साई रिसॉर्टशी संबंधित आहे.

अनिल परब यांच्यावर आतापर्यंत झाली कारवाई

  1. अनिल परब यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 420, 34 नुसार एफआयर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
  2. अनिल परब यांच्याविरोधात महाराष्ट्र नगररचना कायद्याच्या कलम 52 आणि 53 अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
  3. अनि परब यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 202 अन्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  4. एमआरटीपी कायद्याच्या कलम 52 अन्वयेही अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातही परब यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
  5. अनिल परब यांच्याविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फेही दंड वसूल करण्याची कारवाई केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...