आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचा आणखी एक गंभीर आरोप:संजय राऊत मित्र परिवाराचा 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा, सोमय्यांचा आरोप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वात नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI,महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक असल्याचा आरोप केला होता.

सोमय्यांच्या आरोपांना राऊतांचे दिले होते प्रत्यत्तर -
किरीट सोमय्या यांच्या आरोपांना राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राऊत म्हणाले होते, किरीट सोमय्या यांची मुले हरभरा विकतात का? अमित शहांची मुले केळी विकतात? माझा काही वायनरी व्यवसाय असेल तर भाजप नेत्यांनी तो ताब्यात घेऊन चालवावा. माझ्या मुली एखाद्या कंपनीत डायरेक्टर असतील तर काय चुकले. भाजप नेत्याच्या मुलासारखे ते अंमली पदार्थांचा व्यवसायात नाहीत, असे जोरदार प्रत्युत्तर राऊत यांनी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...