आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपांवरुन प्रत्युत्तर:माझ्या नादी लागू नका, स्टंटबाजी दुसरीकडे करा; किरीट सोमय्यांनी संजय राऊतांना सुनावले खडेबोल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या नादी लागू नका. तुमची टीव्हीवरची स्टंटबाजी दुसरीकडे जाऊन करा, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी INS विक्रांत घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या यांची चौकशी करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्याला पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरेंनीच मला क्लिन चीट दिली

किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच संजय राऊत यांनी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर एक नव्हे तर तब्बल 24 आरोप केले. उद्धव ठाकरेंनीच या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशीही झाली. मात्र, 120 दिवसांनंतर मला क्लिन चीट देण्यात आली. उद्धव ठाकरे सरकारनेच मला क्लिन चीट दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे आपला वापर करत होते का?, याचा विचार संजय राऊतांनीच करावा, असे सोमय्या म्हणाले.

माझ्याविरोधात एक FIR नाही

किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी 120 दिवसानंतर मला क्लिन चीट देऊन संजय राऊतांनाच तोंडघशी पाडले. किरीट सोमय्या, नील सोमय्या कुणावरही एका दमडीचीही अ‌ॅक्शन घेण्यात आली नाही. कुणावरही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही. आता संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून स्टंटबाजी करत आहेत. त्यांनी ही स्टंटबाजी दुसरीकडे करावी. माझ्या नादी लागू नये.

संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांनी 'विक्रांत' युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना 'क्लीन चिट' दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे.

संजय राऊत 57 पैशांचा कागदही दाखवू शकले नाही

याला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी INS विक्रांतच्या नावाखाली मी 57 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप केला आहे. मात्र, उच्च न्यायालयात ते 57 पैशांचाही कागद दाखवू शकले नाहीत. उलट याप्रकरणी ज्या व्यक्तीने माझ्याविरोधात तक्रार केली होती. तो तक्रारदारच फ्रॉड निघाला. संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहून मी तक्रार केल्याचे तक्रारदाराने सांगितले. त्यावरुन न्यायालयाने कशी खरडपट्टी काढली होती?, हे संजय राऊत विसरले का?, असा सवाल सोमय्यांनी केला.

पत्राचाळ घोटाळ्यावरुन निशाणा

किरीट सोमय्या म्हणाले की, वसई-विरार येथे नील सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणात 13 एप्रिल 2005 ला उच्च न्यायालयाने तक्रारदाराचीच बिनपाण्याने केली होती. आरोप केल्यानंतर संजय राऊत साधा एक कागदही न्यायालय किंवा पोलिसांत देऊ शकलेले नाहीत. त्यांनी माझ्यावर आरोप करण्याऐवजी पत्राचाळ घोटाळ्यात किती पैसे खाल्ले हे जनतेला सांगावे, असा टोला सोमय्यांनी लगावला.

संबंधित वृत्त

खोचक सवाल:मोदी हे तेजस्वी सूर्य, देशात प्रकाश त्यांच्यामुळेच; मग नीरव मोदी, विजय मल्ल्या कसे पळाले?- संजय राऊत

मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. एवढेच नव्हे तर मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. भारतात जेवढा प्रकाश पडला आहे, तो मोदींमुळेच पडला आहे. तरीही विजय मल्ल्या कसे काय पळून गेले? अदानींना मोदी का वाचवत आहेत?, असा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपला चिमटे काढले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही बाजारबुणगे मोदींवर टीका करत आहेत. हे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांना खोचक उत्तर दिले. वाचा सविस्तर