आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गदा आणि हातोडा घेऊन किरीट सोमय्या बॅक इन अ‍ॅक्शन:अनिल परब यांचे 'ट्विन रिसॉर्ट' दिवाळीपर्यंत जमीनदोस्त करणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडामध्ये ट्विन टॉवर पाडण्यात आला, त्याचप्रकारे आता मी एका हातात गदा व एका हातात हातोडा घेऊन दापोलीतील भष्ट्राचाराचे स्मारक पाडणार, अशी गर्जना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात अयोध्या इथल्या प्रस्तावित श्री राम मंदिराचा भव्य खावा उभारण्यात आला आहे. देखाव्याच्या उद्घाटन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट दिवाळीपर्यंत जमीनदोस्त करणार असल्याचा संकल्प किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणाले की, हे गणयारा तु मला शक्ती दे. या शक्तीने मी दिवाळीपर्यंत ठाकरे सरकारच्या घोटाळ्याचे प्रतिक अनिल परबचे ट्विन रिसार्ट जमीनदोस्त करणार.

काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या अनेक दिवासांपासून याच रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप भाजपकडूनही केले जात आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच ईडीकडून सर्च ऑपरेशनमध्ये अनेक कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली होती.

रिसॉर्टच्या व्यवहारात गडबड
वर्ष 2017 मध्ये परब यांनी दापोलीत 1 कोटी रुपयांमध्ये भूखंड खरेदी केला. 2019 मध्ये त्याची नोंदणी केली. सन 2020 मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना हा भूखंड 1 कोटी 10 लाखांत विकला. मात्र सन 2017 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत तिथे रिसॉर्ट उभे राहिले. यासाठी 6 कोटी रुपये खर्च केले. हा पैसा परब यांचा असल्याचा ईडीला संशय आहे.

आरोपांचे खंडन
अनिल परब यांनी सोमय्या यांच्या आरोपांचे यापूर्वीच खंडन केले आहे. इतकेच नव्हे तर 'दापोली रिसॉर्टशी माझा काहीच संबंध नसताना सोमय्या यांनी निव्वळ आपला राजकीय हेतू साधण्यासाठी व प्रसिद्धीसाठी माझी नाहक बदनामी चालवली आहे, असे अनिल परब म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...