आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या विरोधातील विविध नेत्यांच्या कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश करून सतत चर्चेत राहणारे भाजप नेते किरीट सोमय्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफांविरोधातील न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याच्या चौकशीचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.
पुण्याचे न्यायाधीश करणार चौकशी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील फसवणूक केल्याप्रकरणाची न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी चौकशी करतील. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत 24 एप्रिल 2023 पर्यंत सक्तीच्या कारवाईपासून संरक्षणही दिले आहे.
सोमय्यांकडून प्रतिक्रिया नाही
न्यायालीन कागदपत्रे मिळवण्याच्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे हे निर्देश म्हणजे किरीट सोमय्यांसाठी मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावर किरीट सोमय्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर विरोधी पक्षांकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.