आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचा गृहमंत्र्यांना पत्रातून सवाल:माझे 'ते' फोटो व्हायरल करणाऱ्या शिवसेनेच्या सरनाईकांवर कारवाई केव्हा करणार?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रालयात मी फाईल्स तपासताना गैरकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईकवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार ? सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. यावेळी शिवसेनेचा माफिया सेना असा उल्लेख करत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आगपाखड केली. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांची नगरविकास खात्याच्या कार्यालयातील फाईल्स चाळल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. नवनीत राणा हॉस्पिटल फोटोवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते मंत्रालयातील माहिती अधिकारा खाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना गैरकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईकवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

दिलीप वळसे पाटील यांना पत्र-
याशिवाय, किरीट सोमय्या यांनी फोटो व्हायरल प्रकरणी गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहले आहे. 'मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात मी 24 जानेवरी 2022 रोजी फाईल्स पाहण्यासाटी गेलो होतो. तेव्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक माझ्या जवळ आले. माझ्या शेजारी बसले. मी फाईल पाहत असताना त्यांनी असे मुद्दाम तिथे त्यावेळेला येणे. व आसपासच्या अधिकाऱ्यांना धमकावणे हे कायद्यांचा भंग करणारे आहे, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

यासंदर्भात तक्रार करून अनेक महिने झाले आहेत. सरनाईक यांनी नियमांचा भंग केला. गैरकायदेशीररित्या फोटो काढले. ते फोटो व्हायरल केले. पण अद्याप महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी एफआयर घेतला नाही, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय प्रकरण?

किरीट सोमय्या हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. याठिकाणी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत होते. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...