आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना उपचार बिल:'बनवा बनवी थांबा आणि खासगी रुग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलांविरोधात कारवाई करा', किरीट सोमय्यांचे आरोग्यमंत्री टोपेंना पत्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत  आहे. याच काळात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात आहे. डॉक्टरांकडून रुग्णांची लूट केली जात आहे. सामन्य रुग्णांना हे परवडणारे नाही. राज्यातील सर्वच शहरांमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारलं जात आहे. याविरोधात आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

किरीट सोमय्या यांनी लिहिले की, मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना विनंती करतो की, ही बनवा बनवी थांबवा आणि खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल आकराणाऱ्यांविरोधात प्रत्यक्ष कृती करा. महाराष्ट्र सरकारला आणि महापालिकेला  चांगल्या प्रकारे माहिती आहे की, त्यांनी फक्त बेड चार्जेस निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना अपारदर्शक, अव्वाच्या सव्वा बिल आकारायला मुभा दिली आहे, त्यांनी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

पुढे सोमय्यांनी लिहिले की, पीपीई कीट, कोविड व्यवस्थापन आणि अन्य चार्जेसच्या नावाखाली ही मोठ्या प्रमाणात बिल आकरलं जात आहे. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांचं उदाहरणंही दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, एका रुग्णाच्या नातेवाईकाला 18 लाख रुपये बिल आकारण्यात आलं आहे. तसेच रिक्षावाला, छोटया व्यापाऱ्याला लाखो रुपयाचे बिल आकारण्यात आली आहेत.