आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज कोर्टाने फेटाळला:किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या ५७ कोटी रुपयांच्या निधी प्रकरणात कथित घोटाळा केल्याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नील यांच्या अर्जावर मंगळवारी निर्णय होईल.

अटक होण्याच्या भीतीमुळे सोमय्या पिता-पुत्रांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज फेटाळताना न्यायाधीशांनी म्हटले की, आयएनएस विक्रांत मोडीत काढण्यापासून वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी जमा केल्याची छायाचित्रे आहेत, पण हा निधी राज्याच्या राज्यपालांच्या कार्यालयात जमा करण्यात आला नाही. माजी सैनिक भोसले यांनी मानखुर्दमधील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्राविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.