आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचा राऊतांवर पलटवार:म्हणाले- मी संजय राऊतांची परिस्थिती समजू शकतो, त्यांनी केलेल्या आरोपावर चौकशीसाठी तयार, पण ते कोविड सेंटर घोटाळ्यावर का बोलत नाहीत?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.

ट्वीटच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर अजून तीन तीन खटले पाइपलाइनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचे स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही.

संजय राऊतांनी काय केले आरोप?

निल सोमय्या पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यानेच निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. या सर्वांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादाने जर यावर अॅक्शन घेतली तर त्यावर कारवाई होऊ शकते. मी आदित्य ठाकरेंना आवाहन आवाहन करतो की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा. यासोबतच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...