आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांचे रवींद्र वायकरांवर गंभीर आरोप:मुंबई मनपाच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचे बांधकाम सुरू असल्याचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवीद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप - Divya Marathi
किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवीद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र वायकर यांनी मुंबई मनपाच्या दोन लाख वर्ग फुटावर अनधिकृत कब्जा केला आहे. तिथे 500 कोटींचे पंचतारंकित हॉटेलचे बांधकाम सुरू आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले सोमय्या

उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. रवींद्र वायकर यानी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी अनधिकृत कब्जा केला आहे. तिथे दोन लाख वर्ग फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्याची सुरुवात केली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत 500 कोटी इतकी होत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

सोमय्यांचे टविट काय?

उद्धव ठाकरेंचे भागीदार आ. रवींद्र वायकरांचा 500 कोटींचा "5 स्टार" हॉटेल घोटाळा महापालिकेच्या आरक्षित जागेवर उद्धव ठाकरेंनी वायकरांना 23/7/2021 रोजी 2 लाख वर्ग फुटांचे 5 स्टार हॉटेल मंजूर केले महापालिकेने तातडीने काम थांबवण्याची सूचना देऊन गुन्हा नोंदवायला हवा.

रवींद्र वायकर यांनी मुंबईतील जनतेसाठी आरक्षित असलेले क्रीडांगण व गार्डनच्या जागेवर त्यांच्या सुप्रीमो कंपनीद्वारे आधी सुप्रीमो बँक्वेट बांधले. येथील बागेची रेडी रेकनरनुसार 4 कोटी किंमत होती. मात्र, वायकर यांनी हा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. गेली अनेक वर्ष या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार रवींद्र वायकर करत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...