आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचे टीकास्त्र सुरूच:चौकशी होणार असल्यानं किशोरी पेडणेकरांनी नौटंकी सुरू केल्याचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसआरए घोटाळाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची लवकरच चौकशी होणार आहे. त्यामुळेच त्यांची आता नौटंकी सुरू आहे, अशी टीका आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली.

किशोरी पेडणेकर यांनी काल किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. सोमय्यांच्या आरोपांमुळे माझ्या सासूचा बळी घेतला, असे पेडणेकरांनी सांगितले होते. तसेच, वरळी गोमाता येथे कुलुप घेऊन जात माझे गाळे येथे असेल तर त्याला टाळे ठोका, असे आव्हानच पेडणेकरांनी सोमय्यांनी दिले होते.

उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबले

पेडणेकरांच्या या सर्व आरोपांवर सोमय्यांनी आज पत्रकार परिषद घेत पेडणेकरांना प्रत्युत्तर दिले. सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे सरकार असतानाच मी किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबले. या प्रकरणाची चौकशी होऊ दिली नाही. मात्र, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. त्यांनी एसआरएला प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

एसआरएची पेडणेकरांना नोटीस

सोमय्यांनी सांगितले की, एसआरएने आपल्याला या प्रकरणात दोन वर्षांपूर्वीच क्लिन चीट दिल्याचे पेडणेकर सांगत आहे. मात्र, आज एसआरएने किशोरी पेडणेकर व प्रकणाशी संबंधित मिलिंद अंधारी यांना नोटीस बजावली आहे. मिलिंद अंधारी यांना एसआरएने जो गाळा दिला, त्याची विक्री करण्यास मनाई होती. तरीदेखील त्यांनी तो गाळा कसा विकला, असा सवाल एसआरएने विचारला आहे. तसेच, अंधारी यांनी आपला गाळा पेडणेकरांनाच विकला, याचे कागदपत्रेही आता समोर आले आहेत. त्यामुळे एसआरएने या प्रकरणात आता पेडणेकरांनाही नोटीस बजावली आहे.

आता भीतीमुळे नौटंकी

सोमय्यांनी सांगितले की, मी स्वत: दोन वर्षांपूर्वी वरळी गोमाता येथे जाऊन एसआरए गाळ्यांची पाहणी केली होती. तेव्हा तो गाळा किशोरी पेडणेकरांच्या कंपनीच्या ताब्यात होता. आता किशोरी पेडणेकर तिथे टाळे सोबत नेत नौटंकी करत आहे. आपली चौकशी होणार हे माहित असल्यानेच त्या आता अशी नौटंकी करत आहेत.

कंपनीचे मालक पेडणेकरांचे पती

सोमय्या यांनी सांगितले की, किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेट या कंपनीनेच एसआरएचा गाळा बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात घेतले. ही कंपनी 2012मध्ये स्थापन करण्यात आली होती. कंपनीचे मालक किशोर पेडणेकर हे किशोरी पेडणेकर यांचे पती आहेत. म्हणजेच ही कंपनी किशोरी पेडणेकरांचीच होती, हे स्पष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...