आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांनी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकरांविरोधात कारवाई का केली नाही? याचे उत्तर द्यावे. असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांनी चुकीची कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, संजय महादेव अंधारी यांनी बोगस सह्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सेक्शन 448 अंतर्गत कोर्टाने गुन्हा दाखल केला आहे. 6 फेब्रुवारीला यातील आरोपींना समन्स जारी करण्यात आले आहेत. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद किशोर पेडणेकर, गिरीश रमेश देवणकर, प्रसाद महेश गवस, कैलास प्रशांत गवस यांच्या नावाने समन्स निघाले आहेत. 6 फेब्रुवारीला कोर्ट त्यांना जामिनावर सोडणार आहे.
कोट्यावधी रुपयांची फसवणूक
पुढे किरीट सोमय्या म्हणाले, माझा प्रश्न उद्धव ठाकरे यांना आहे, महापौरपदावर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी हा घोटाळा केला. त्यांच्याविरोधात शिवसेनेने काय कारवाई केली? ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशन किशोरी पेडणेकर यांनी 2012 मध्ये केले होते. त्यावेळीपण बोगस सर्टिफिकेट जारी केले होते. 2017 मध्ये पुन्हा फसवणूक केली. संजय अंदारीचे नाव आणि किशोरी पेडणेकर यांचा भाऊ सुनिल कदमचा फोटो त्यांनी वापरला होता. कोट्यावधी रुपयांचे कोविड सेंटर्स त्यांनी उघडले. या सेंटर्समध्ये एकही रुग्ण भरती झालेला नाही.
प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा
किरीट सोमय्या म्हणाले, मी सरकारला विनंती करतो, या गुन्ह्यात 2 ते 7 वर्षांची शिक्षा आहे. महापौर जर अशाप्रकारची फसवणूक करत असतील तर हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. त्यांना शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
राऊतांवर अजामीनपात्र वॉरंट
शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट:मेधा सोम्मयांच्या मानहानी प्रकरणी कोर्टाचे आदेश; 24 जानेवारीला पुढील सुनावणी
शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.