आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलबदल:कीर्तिकर, नाईक, साळवी शिंदे गटात करणार प्रवेश ? राज्यात 1 खासदार, 3 आमदार पक्षांतराच्या तयारी

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरू आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे १०-१५ नेते विजयादशमीला शिंदे गटात ‘सीमोल्लंघन’ करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि पाच ते दहा माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या आठ लोकप्रतिनिधींसह एकूण दहा ते पंधरा शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याची चर्चा आहे. या सर्वांची वेगवेगळ्या महामंडळांवर वर्णी लागू शकते. एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची हरतऱ्हेने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी ४० आमदार, मग १२ खासदार, काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. आता एक खासदार आणि दोन आमदारही त्यात सहभागी झाल्यास हा आकडा वाढून ४२ आमदार, १३ खासदार असा होईल. अनेक पदाधिकारी-शिवसैनिक यांना फोडल्यानंतर शिंदेंनी ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्ती नेतेही गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी जुन्या जाणत्या नेत्यांनाही शिंदेंनी जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावर दावा सांगितलेला असतानाच आता शिवसेना, ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरणही संपवण्याचा प्रयत्न शिंदे गट करताना दिसत आहे.

शिवाजी पार्क गोठवण्याची तयारी दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांना ‘शिवतीर्था’वर दसरा मेळावा घेता येऊ नये आणि ठाकरेंची परंपरा खंडित व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी रणनीती आखल्याची माहिती आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर शिवाजी पार्कच्या मैदानावर परवानगी दिली जात असल्यामुळे ठाकरेंचे पारडे जड मानले जाते. त्यामुळे शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानच गोठवण्याची तयारी केल्याचे समजते.

हे नेते गळाला ? : उत्तर पश्चिम मुंबईचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, तसेच कोकणातील कुडाळचे शिवसेना आमदार वैभव नाईक आणि राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी, त्याबरोबरच मुंबई महापालिकेतील नगरसेवक अमेय घोले हे दसऱ्याला शिंदे गटात जातील, अशा जोरदार चर्चा आहेत.

बातम्या आणखी आहेत...