आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते किरीट सोमय्या स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ड्राफ्ट्स तयार करतात. त्यामाध्यमातून गरीब लोकांना त्रास देतात. माझी बदनामी करतात, असा आरोप मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.
वरळी गोमाता एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बाजू मांडताना किरीट सोमय्या व एसआरए प्रशासनावरही टीका केली.
माझ्या बदनामीचा कट
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, वरळी गोमाता येथे मी भाड्याने जागा घेतली होती. नंतर नियमाप्रमाणे ती जागा भाड्याने दिली होती. स्वत: एसआरएने या प्रकरणात भाडेकरूंना 2010 मध्ये अलॉटमेंट लेटर दिले आहे. तरीही किरीट सोमय्यांच्या सांगण्यावरून येथे राहणाऱ्या गरीबांना त्रास दिला जात आहे. केवळ माझी बदनामी करण्यासाठी किरीट सोमय्या हे सर्व करत आहे.
जुनी प्रकरणं उकरून काढताय
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, किरीट सोमय्या हे कॅरेक्टर सर्व महाराष्ट्राला माहित झाले आहे. वरळी गोमाता येथील ज्या घराशी माझा केवळ ११ महिन्याचा संबंध होता. त्यावरून मला लक्ष्य केले जात आहे. मुळात एसआरएकडे अशा अनेक तक्रारी पेंडीग आहेत. मात्र, त्यांचा निचरा होत नाही आणि जुनी प्रकरणं बाहेर काढली जात आहेत.
कोर्टात सर्व सिद्ध होईल
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 2013 नंतर माझा क्रिश कॉर्पोरेटशी संबंध नाही. संजय अंधारे यांनी माझ्याकडून तब्बल 10 वर्षांनंतर वरळी गोमाता येथील गाळे नियमाप्रमाणे भाड्याने घेतला. ही सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. कोर्टात हे सर्व उघड होईल. केवळ शिवसेनेची म्हणून माझ्यावर जे काही आरोप होत आहे, त्यामुळे मी थांबणार नाही.
पेडणेकरांवर काय आहे आरोप?
किशोरी पेडणेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे बनवून वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे गिळंकृत केले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी आरोप केला आहे की, पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे 'एस.आर.ए'चे गाळे हडप केले. एवढच नव्हे तर बोगस बनावटी कागदपत्रे करुन गोमाता जनता येथील एसआरएचे गाळेही स्वत:च्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेट कंपनीच्या नावाने करण्याचा गुन्हा केला. सोमय्या यांनी पडणेकर यांची कंपनी व गाळाधारक संजय अंधारी यांच्यादरम्यान झालेल्या कराराची प्रतही जारी केली आहे. मात्र, हे सर्व आरोप पेडणेकरांनी फेटाळून लावले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.