आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून अडीच तास चौकशी:चौकशीनंतर म्हणाल्या- साप म्हणून उगाच दोरी बडवली जातेय, आरोपांत तथ्य नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसआरए घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज दादर पोलिसांनी तब्बल अडीच तास चौकशी केली. चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, पोलिसांना मी सर्व उत्तरे दिली आहेत. मात्र, माझ्यावर आरोप करुन उगीच सापाच्या नावाखाली विरोधक दोरी बडवत आहेत. माझ्यावर जे आरोप करण्यात आलेत, त्यामध्ये दहा टक्केही सत्यता नाही.

भीती कशाची?

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, माझ्याावर एका पक्षाच्या माजी खासदाराने आरोप केले आहेत. त्यांचे प्रत्येक आरोपाला उत्तर दिलेच पाहीजे, अशी काहीच गरज नाही. मी पोलिसांना सहकार्य करणार नाही, अशी उगीच खोटी बातमी पसरवली गेली. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत. कर नाही त्याला डर कशाला.

पोलिसांना सर्व उत्तरे दिली

पेडणेकर म्हणाल्या, दादर पोलिसांनी यापूर्वी चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हाच मी 3 दिवसांनंतर येणार असल्याचे सांगितले होते. आज माझी अडीच तास चौकशी केल्याचे दिसत असले तरी बराच वेळ पोलिसांशी गप्पा मारण्यात गेला. त्यानंतर त्यांनी जे काही प्रश्न विचारले, त्याला मी सविस्तर उत्तर दिले आहे.

आरोपीसोबत चॅट केले नाही

एसआरए घोटाळ्यातील एका आरोपीने किशोरी पेडणेकरांसोबत व्हॉट्सअॅप चॅट केल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना पेडणेकर म्हणाल्या, मला दिवसातून कित्येक जण व्हॉट्सअॅपवर मॅसेज करत असतात. ज्या चॅटवरुन माझ्यावर आरोप करण्यात येत आहे, ते चॅट मी वाचले का? त्यांना रिप्लाय दिला का? याचे उत्तर कोण देणार, असा सवाल पेडणेकरांनी केला. तसेच, आरोपीचे चॅट मी वाचलेच नव्हते, असे सांगितले.

शिंदे, फडणवीसांना भेटणार

पेडणेकरांनी सांगितले, यापुढे मी किरीट सोमय्यांना उत्तर देणार नाही. केवळ कायद्याची लढाई लढणार आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून मी निवेदन देणार आहे. तो माझा हक्क आहे.

बातम्या आणखी आहेत...