आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल महाराष्ट्राबद्दल बरळतात. त्यांना परत पाठवा. वादग्रस्त राज्यपाल म्हणून ते जगात प्रसिद्ध झालेत. राज्यापालांनी बोलताना भान राखावे. पुन्हा महाराष्ट्राचा अपमान करण्याची हिंमत करू नये, असे किशोरी पेडणेकर म्हणाले.
पोट भरण्यासाठी येणाऱ्या सर्वांना आपला महाराष्ट्र आणि मुंबई सगळ्यांना सामावून घेते. जर हा गुन्हा आहे. तर असे गुन्हे आम्ही पुन्हा करू, असेही पेडणेकर म्हणाल्या. कोश्यारी पक्षाचे काम करतात. राज्यपाल पदाला शोभेल असे काम त्यांनी एकदाही केले नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवालही त्यांनी केला.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. त्यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, नितेश राणे ज्या पक्षात जातात. त्या पक्षाची सुपारी वाजवतात. आधी काँग्रेसची वाजवत होते आणि आता भाजपची वाजवत आहेत. शिवसेनेने कुणाला मोठे केले याचा त्यांनी इतिहास नितेश यांनी पाहावा आणि नंतरच बोलावे.
काय म्हणाले राज्यपाल?
महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.