आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिशोबात राहा, तुझी लायकी नाही:किशोरी पेडणेकरांनी मनसे प्रवक्त्यांना सुनावले, दसरा मेळाव्यात शिंदे गटाने भान ठेवण्याचा इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिशोबात राहा, उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची तुझी लायकी नाही, अशा शब्दांत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसे प्रवक्ते योगश चिले यांना सुनावले.

'तमाम हिंदू बांधवानो' म्हणणारच

तमाम हिंदू बांधवानो, असे म्हणण्याचा अधिकार आता उद्धव ठाकरेंना नाही, असे मनसे प्रवक्ते म्हणाले. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आता कोणीही ऐरागैरा नट्टूथैरा उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. त्याची आम्ही दखल घेत नाही. लोकशाहीने त्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी तेवढ्याच मर्यादेत राहाव. उद्धव साहेबांपर्यंत पोहचण्याची तुझी लायकी नाही. आधी स्वत:च्या पक्षाकडे पाहा. आपले काही लोक निवडून कसे येतील विचार करा. 'तमाम हिंदु बांधवांनो', हे संबोधन पूर्वीही वापरत आलो आहोत. यापुढेही वापरणारच.

दसरा मेळाव्यासाठी एसटीचा वापर

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी हजारो एसटी बस बुक केल्या आहेत. त्यामुळे ऐन दसऱ्यात सामान्य प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता आहे. यावर एसटी संप सुरू असताना सामान्य प्रवाशांची अडचण झाली नाही, तर एका दिवसाने काय होणार, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यावरही किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली आहे.

शिंदे गटाने भान ठेवावे

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, राज्य सरकारमधील मंत्रीच आता बेताल वक्तव्य करत आहेत. जनतेची काळजी नसणारे लोक सत्तेत आहेत. जनता त्यांच्यावर छि, थू करते तरी त्यांना त्याची पर्वा नाही. सत्तेचा या लोकांना उन्माद आला आहे. मात्र, दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी भान ठेवावे. उद्धव ठाकरे इतरांवर टीका करताना कधीही पातळी सोडत नाही. दुसऱ्याच्या चारित्र्याची चिरफाड करत नाही. शिंदे गटाने याचे भान ठेवावे.

मेळाव्यात कर्मचाऱ्यांची गर्दी

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून सर्व प्रयत्न केले जात आहे. एकीकडे गोरगरीब जनता रडत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नाष्टा, जेवणाच्या पंक्ती उठणार आहेत. कार्यकर्त्यांना लुभावण्यासाठीच या क्लृप्त्या केल्या जात आहेत. तसेच, गर्दी जमवण्यासाठी शासकीय सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना उद्या दुपारनंतर सुट्टी दिली जाणार आहे, असा आरोपही पेडणेकर यांनी केला.

कदमांचे पुत्र युवासेनेत कसे?

रामदास कदम यांचेच पुत्र सिद्धेश कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटीत असल्यावरुन पेडणेकर यांनी रामदास कदमांवर टीका केली. पेडणेकर म्हणाल्या, रामदास कदम यांच्यामध्ये फुटीची दही कशी आहे, हे नारायण राणे यांना माहित आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना पुष्टी देणारे कदमच होते. तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांना व त्यांच्या मुलांना सन्मानाने वागवले. मात्र, आता त्यांचा पुत्र अजूनही युवा सेनेत कसा, याची गंभीर दखल घेतली जाईल. युवा सेनेचे पदाधिकारी आपल्या कामकाजात नक्कीच सुधारणा करतील.

बातम्या आणखी आहेत...