आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांचा तोल सुटला:'कार्यकर्त्याने रागाच्या भरात ती कमेंट केली', सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना महापौरांनी 'तुझ्या बापाला' असे उत्तर दिले

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आजही त्या चर्चेत आल्या, पण विषय होत ट्विटर कमेंटचा. ट्विटरवरील एका कमेंटला उत्तर देताना समोरच्या व्यक्तीच्या 'बाप' काढल्यामुळे पेडणेकर यांना नेटकऱ्यांनी चांगलचं धारेवर धरलं. या प्रकारानंतर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण देताना, एका कार्यकर्त्याने माझ्या फोनवरुन ही कमेंट केल्याचे सांगितले.

काय आहे प्रकरण ?
महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. या मुलाखतीत त्या मुंबईतील लसीकरणासंदर्भात बोलत होत्या. लसीकरणाच्या जागतिक निविदेला 9 कंपन्याचा प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते. मुलाखतीच्या व्हिडीओवर एका युझरने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी "तुझ्या बापाला'' असे उत्तर दिले. महापौरांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलेली कमेंट नंतर डिलीट केली. पण, तोपर्यंत याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

पेडणेकर यांचे स्पष्टीकरण
पेडणेकर यांच्या कमेंटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यापर सर्व स्तरातून संतापाची लाट उमटली. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले. एका कार्यक्रमानिमित्त त्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, कार्यक्रमादरम्यान माझ्या मोबाईल कार्यकर्त्यांकडे होता. यावेळी त्यांनी त्या व्यक्तीची कमेंट वाचली आणि रागाच्या भरात त्याला रिप्लाय दिला.

यापुढे कुणालाही फोन देणार नाही
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, फोन परत माझ्या हातात आल्यानंतर सर्व प्रकार समजला आणि तात्काळ ती कमेंट डिलीट केली. तसेच, या घटनेवरुन आपला फोन कुणालाच द्यायचा नाही, हे समजल्याचेही त्यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...