आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस ठाकरेंची राजकारणात होणार ग्रॅण्ड एन्ट्री:किशोरी पेडणेकरांचे सूचक विधान; म्हणाल्या - तेजस 'खेकड्यांना' वठणीवर आणतील

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेजस ठाकरे हे ओजस्वी तसेच तेजस्वी आहेत. त्यामुळे तेजस हे नाव कधी राजकारणात आले तर ते ओजस्वी रितीने काम करतील. तेजस ठाकरेंची राजकारणामध्ये ग्रँड एंट्री होणार, असे वक्ततव्य मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज केले.

उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या चर्चा होत आहेत. मात्र अजून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाही. आता किशोरी पेडणेकरांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेजस ठाकरे प्रकाशझोतात आले आहेत. तेजस ठाकरे हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैव विविधतेवर संशोधन करत आहेत. आता ते राजकारणात उतरतील अशी शक्यता आहे.

उद्धव ठाकरे घोषणा करतील

प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तेजसची ओळखच वेगळी आहे. खेकड्यांना कसे वटणीवर आणायचे हे त्यांना माहित आहे. आणि वेगवेगळ्या खेकड्यांना त्यांनी तेजस खेकडा, ठाकरे खेकडा अशी नावे दिली आहेत. ते राजकारणात एंट्री करतील का नाही याबाबत त्यांचे वडिल आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगु शकतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनपा निवडणूकीत सक्रिय होणार

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना ढासळल्याचे दिसत आहे. शिवसेनेला सावरण्यासाठी तेजस ठाकरे यांच्या राजकीय लाँचिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमाकरिता शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तेजस ठाकरे यांचेही फोटो झळकले होते. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस शिवसेनेत सक्रिय होऊ शकतात.

बाळासाहेब म्हणाले होते..

तेजस ठाकरे यांच्याविषयी बाळासाहेबांनी केलेले एका विधानाची नेहमीच चर्चा होते. बाळासाहेब म्हणाले होते, उद्धवचा नंबर दोनचा मुलगा सेम माझ्यासारखाच आहे. त्याच्या आवडीनिवडी माझ्याशी जुळतात. असे बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कच्या भाषणात जाहिरपणे बोलले होते. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी मर्सिडीजमधून राज भवनावर पोहोचले होते. त्यावेळी पुढच्या सीटवर त्यांच्यासोबत तेजस ठाकरे बसले होते. संपूर्ण सत्तासंघर्ष त्यांनी जवळून पाहिला होता. त्यामुळे कदाचित त्यांचे लवकरच राजकारणात आगमन होणार असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...