आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Knee Fracture; Still Played All Matches In The World Cup! Inspired By Dhoni's Support: Shami

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वक्तव्य:गुडघ्याला फ्रॅक्चर; तरीही विश्वचषकात सर्व सामने खेळलो! धाेनीच्या पाठबळामुळे मिळाली प्रेरणा : शमी

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीपूर्वी शमीला चालणेही झाले होते कठीण

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला २०१५ विश्वचषकात गुडघ्याच्या फ्रॅक्चरनंतरही खेळावे लागले होते. तो संपूर्ण स्पर्धा औषधी घेऊन खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीपूर्वी शमीला चालणेही कठीण झाले होते. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केले होते की, या मोठ्या सामन्यात इतर कोणत्याही गोलंदाजासोबत उतरू शकत नाही. दुखापतीमुळे त्याचे करिअर धोक्यात आले होते. त्याला त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. 

२६ मार्च २०१५ नंतर त्याने पुढील सामना जुलै २०१६ मध्ये खेळला होता. शमीने माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणसोबत बोलताना म्हटले की, ‘उपांत्य फेरीपूर्वी मी सहकाऱ्यांना म्हटले की, माझ्यासाठी ही गंभीर दुखापत आता असहनीय झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...