आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईचा ऑक्सिजन मॅन:लोकांच्या मदतीसाठी 22 लाखांची SUV विकली, 4 हजार कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचवले सिलेंडर

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवली आहे

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकीकडे रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावत आहेत, तर दुसरीकडे मुंबईच्या मलाडमध्ये राहणारे शहनवाज शेख लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत. 'ऑक्सिजन मॅन' म्हणून प्रसिद्ध झालेले शेख एका फोन कॉलवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहेत. लोकांना अडचण येऊ नये यासाठी त्यांनी एक 'वॉर रुम' ही तयार केली आहे.

शाहनवाज यांनी लोकांच्या मदतीसाठी काही दिवसांपूर्वी आपली 22 लाखांची SUV विकली होती. आपल्या फोर्ड एंडेवरच्या विक्रीनंतर मिळालेल्या पैशांनी शाहनवाजने 160 ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करुन गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत. शाहनवाज यांनी सांगितले की, गेल्या वर्षी लोकांच्या मदतीदरम्यान आमच्याजवळचे पैसे संपले. यानंतर मी माझी कार विकण्याचा निर्णय घेतला.

लोकांना मदत करण्याची प्रेरणा अशी मिळाली
शाहनवाज म्हणाले की, गेल्या वर्षी संक्रमण कालावधीच्या सुरूवातीलाच त्यांच्या एका मित्राच्या पत्नीने ऑक्सिजन अभावी ऑटो रिक्षात मृत्यू प्राण सोडले. त्यानंतर त्यांनी आता मुंबईतील रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. लोकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आणि वॉर रुमही बनवली.

पहिले 50 आणि आता 500 ते 600 कॉल येत आहेत
शाहनवाज सांगतात की, या वेळी परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती. जानेवारीत जिथे ऑक्सिजनसाठी 50 कॉल होते, आज दररोज 500 ते 600 कॉल येत आहेत. परिस्थिती अशी आहे की, आम्ही केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत मदत पोहोचवू शकत आहोत.

अशा लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवतो सिलेंडर
शाहनवाज यांनी सांगितले की, त्यांच्याजवळ सध्या 200 ऑक्सिजनचे ड्यूरा सिलेंडर आहेत. ज्यामधून 40 भाड्याचे आहेत. फोन करणाऱ्या गरजूला ते पहिले आपल्याकडे बोलावून ऑक्सिजन घेऊन जाण्यास सांगतात आणि जे सक्षम नसतात त्यांच्या घरी ते सिलेंडर पोहोचवतात.

4000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवली आहे
टीमचे लोक रुग्णांना याचा वापर कसा करावा याविषयी सांगतात. वापर झाल्यानंतर जास्तीत जास्त रुग्णांचे नातेवाईक वॉर रुमपर्यंत रिकामे सिलेंडर पोहोचवतात. शाहनवाज यांच्यानुसार, त्यांनी गेल्यावर्षीपासून आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवली आहे.

बातम्या आणखी आहेत...