आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामध्ये मुंबई महानगरपालिका (BMC) ने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजनची योग्य व्यवस्था केली. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले आहे. आम्ही मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल आणि आरोग्यविषयक तज्ज्ञांकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला की असे काय कारण होते की, दिल्ली प्रमाणे मुंबईत कोरोना महामारी आणि ऑक्सिजन मॅनेजमेंटविषयी गोंधळ झाला नाही.
सूक्ष्म नियोजन, समन्वय आणि चांगल्या व्यवस्थापनामुळे मुंबईने संक्रमण थांबवले हे कळले. मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंग चहल म्हणाले की कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी आम्ही गेल्या वर्षीच भविष्यातील गंभीरता आणि गरजा ओळखल्या होत्या. चहल यांनी सांगितले की आम्हाला माहिती आहे की संक्रमित लोकांना ऑक्सिजनची खूप गरज आहे, म्हणून सर्व मोठ्या कोविड केंद्रांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आधीच व्यवस्था केली होती.
चहल यांच्याकडून उचलण्यात आले पाऊले
मुंबईमध्ये रोज मिळत आहे 235 मीट्रिक टन ऑक्सिजन
चहल यांनी पुढे सांगितले की, मुंबईला रोज विविध कंपन्यांकडून 235 मीट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे. आम्ही हे सुनिश्चित केले की, ऑक्सिजनच्या प्रोडक्शन स्थळाहून निघण्यापासून रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष टीमने याकडे देखरेख करावी.
24 वॉर रूम, 10 रुग्णवाहिका आणि 50 मोबाइल रुग्णालयांमधून नजर
आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले की, 24 वॉर रुम बनवण्यात आल्या. येथे 10 रुग्णवाहिका आणि 50 मोबाइल व्हॅन बनवण्यात आल्या. दिवसातून अनेकदा झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छ केले जातात. मास्क न लावणाऱ्यांवरही कठोर कारवाई होते. घरापर्यंत राशन पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाने उचलली, यामुळे संक्रमण थांबले.
प्रती 10 लाखांमधून रोज 3.98 लाख लोकांची टेस्टिंग होत आहे
अतिरिक्त मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले की, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल, तपामान तपासले जात आहे. 'चेज द व्हायरस' मोहिममध्ये 4 टी फॉर्मूल्यावरही अमलबजावणी करण्यात आली. 31,695 बेड, 12,754 ऑक्सिजन बेड आणि 2,929 आयसीयू बेड तयार करण्यात आले. प्रती 10 लाखांमधून रोज 3,98,445 टेस्टिंग करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.