आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे धनंजय महाडीक यांच्या घरवापसीच्या चर्चेला उधाण

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक महाडीक यांनी राष्ट्रवादीकडून लढविली होती, पराभवानंतर ते भाजपमध्ये गेले होते

भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व माजी खा. धनंजय महाडीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबईत गुरुवारी भेट घेतली. या भेटीचा फोटो सुळे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केला. या पोस्टमुळे कोल्हापूरच्या राजकिय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. महाडिक पुन्हा स्वगृही परतणार का? अशी चर्चा रंगली आहे.

गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक महाडीक यांनी राष्ट्रवादीकडून लढविली होती. निवडणुकीतील पराभवानंतर महाडीक भाजप मध्ये गेले होते. भाजपने महाडीक यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली होती. आता मात्र यंदाची वर्षी नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर महाडीक यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष ऐवजी त्यांच्याकडे साखर कारखानदारी संदर्भात पक्षीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  

धनंजय महाडिक आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी या भेटीचा कोणताही संदर्भ आपल्या पोस्टमधून दिलेला नाही. दरम्यान, धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरुवारी मंत्रीमंडळ बैठकीत साखर कारखान्यांच्या थकहमी संदर्भात चर्चा होणार होती. त्यासाठी विविध साखर कारखान्यांचे पदाधिकारी गेले होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेलो होतो. श्री. पवार यांची भेट झाली नाही. पण सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे त्यांनी सांगितले.