आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:संभाजीराजेंच्या मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी, 16 जून रोजी काढला जाणार आहे मोर्चा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या म्हणजेच 16 जून रोजी कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन केले जाणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा मूक मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला मराठा मोर्चा आहे. आता छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्या निघणाऱ्या मोर्चामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. बहुजन वंचित आघाडीकडून ही माहिती देण्यात आली आहे.

उद्या म्हणजेच 16 जून रोजी कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले आहे. 'उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.' असे ट्विट वंचित बहुजन विकास आघाडीने केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर पासून खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यासोबतच त्यांनी प्रकाश आंबेडकरांचीही भेट घेतली होती. आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणात नवीन घडामोड घडणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...