आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदत:'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी 'कोकण' बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत

‘कोरोना’च्या लढ्यासाठी कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांनी आज मंत्रालयात मदतीची पे-ऑर्डर सुपूर्द केली.  

संपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपये 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19'साठी देण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...